नमस्कार मित्रांनो म्हणजे काय या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे. म्हणून देशाचेराष्ट्रीय उत्पन्न हे पैशांमध्ये व्यक्त केलेजाते. देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. खऱ्या अर्थाने, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय.
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न समितीचि व्याख्या
“राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय.”
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? प्रा. ए. सी. पिग यांची व्याख्या
“समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय.” या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो.
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? प्रा. आयर्विंग फिशर यांची व्याख्या
“राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेएका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनांपैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो, असा भाग होय.”
हे पण पहा :- क्रेडिट म्हणजे काय
2 thoughts on “राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय”