नमस्कार मित्रांनो म्हणजे काय या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे आज आपण विमा म्हणजे काय, विम्याची तत्वे, व्याख्या व प्रकार पाहणार आहोत ही माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
मानवी जीवन आणि संपत्तीला आलेल्या संभाव्य धोक्या पासून होणारे नुकसान टाळण्याचा किंवा कमी करण्याचा मानव प्रयत्न करतो. झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करता येईल या विचारातून संरक्षणाचे हमी मिळवण्यासाठी विमा या संकल्पनेचा उदय झाला.
विमा म्हणजे काय
विमा म्हणजे आज प्रत्येक जण उदरनिर्वाहासाठी काही ना काही कामधंदा, नोकरी, व्यापार, उद्योग, अथवा व्यवसाय करीत आहे. यामध्ये व्यक्ती आणि संपत्तीला अन्नपेक्षित संकटामुळे केव्हा काय होईल याचा अंदाज करता येत नाही. अर्थात असे असले तरी होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याचा मार्ग मानवाने शोधला असून तो मार्ग म्हणजे विमा होय.
विमा म्हणजे काय व्याख्या
रॉक फेल :- “विमा हे हानीचे वाटप करण्याचे साधन आहे, यामध्ये काही लोकांची झालेले आणि अनेक लोकांमध्ये वाटली जाते.“
विम्याचे प्रकार किती
- व्यक्तिगत विमा :- जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याचा विमा उतरवते तेव्हा अशा विमा कराराला व्यक्तिगत विमा करार असे म्हणतात. याला आयुर्विमा किंवा जीवन विमा करार असे म्हटले जाते.
- मालमत्ता विमा :- व्यक्ती किंवा संस्था अनपेक्षित घटनेमुळे आपल्या मालमत्तेस होणाऱ्या संभाव्य नुकसानी विरुद्ध विमा घेते त्यास मालमत्ता विमा असे म्हणतात.
- हमी विमा :- हमी विमा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अथवा संस्थेच्या विहित जबाबदारी विरुद्ध केलेला विमा करार म्हणजेच हमी विमा.
हे पण पहा 👇